विनोदगुरुजींच्या कार्याविषयी माहिती

विनोदगुरुजींच्या कार्याविषयी माहिती

विनोदगुरुजींच्या कार्याविषयी माहिती

१९७५ पासून सतत कार्यरत असणार्‍या विनोदगुरुजीच्या अनेक पैलूंविषयी माहिती देत आहोत.

शिक्षण: एम.बी.बी.एस., एम.डी.,पी.एच.डी.,डी.एस्सी. (ए.एम.)

- विश्वविख्यात स्व. महर्षि न्यायरत्न विनोद व संस्कृतपंडिता स्व.मैत्रेयी विनोद यांचे कनिष्ठ चिरंजीव. अध्यात्माचा समृध्द कौटुंबिक वारसा. हिमालयात प्रदीर्घ वास्तव्य, सखोल योगसाधना व निर्विकल्प समाधीची प्रत्यक्ष अनुभूती.

- 'महर्षि विनोद रिसर्च फाऊंडेशन' या मान्यवर योगसंस्थेचे कार्यकारी विश्वस्त
- दरवर्षी आषाढी पौर्णिमेला सामुदायिक ' संकल्प समाधी ' व ' निर्विकल्प समाधी 'च्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगांचे संचालन
- तत्वदर्शी विचारवंत व योगशास्त्राचे सखोल अनुभूतिजन्य ज्ञान असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगी
- तीस वर्षांचा योगप्रसिक्षण, योगोपचार व योगसंशोधनाचा प्रदीर्घ अनुभव
- 'शवासन- ध्यान' व `स्वानंद सहयोग साधना' या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांचे जनक व प्रणेते
- भारत, युरोप, अमेरिकेमध्ये व्याख्याने, प्रवचने, ध्यानशिबरे व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये प्रबंध सादर
- अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगपरिषदांमध्ये प्रमुख मार्गदर्शक, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते व प्रमुख मार्गदर्शक या नात्याने सहभाग.
- 'योग व मनोकायिक रोग' या विषयावरील संशोधन प्रकल्पासाठी बर्लिन विद्यापीठ, जर्मनी येथून खास निमंत्रण
- अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगसंस्थांच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग.
- इंग्लंडमधील 'योग फॉर हेल्थ फाौंडेशन' या मान्यवर संस्थेतर्फे आयोजित केलेल्या विसाव्या आणि बाविसाव्या आंतरराष्ट्रीय योगसंमेलनाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते व मार्गदर्शक
- 'योग फेलोशिप ऑफ नॉर्दर्न आयर्लंड ' या सुप्रसिध्द योगसंस्थेमार्फत आयोजित केलेल्या योगविषयक विविध कार्यक्रमांचे खास निमंत्रित व मार्गदर्शक
- फ्रान्समधील 'स्वानंद सहयोग साधना' करणाऱ्या साधकांना मार्गदर्शन करणयासाठी वेळोवेळी दौरे
- महाराष्ट्र रणजी क्रिकेट टीमसाठी खास मार्गदर्शन शिबिर. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट, बुध्दिबळ, टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्नूकर खेळाडूंना व्यक्तिगत मार्गदर्शन
- मार्गदर्शक - योग थेरपी आयर्लंड
- मार्गदर्शक - योग फेलोशिप ऑफ नॉर्दर्न आयर्लंड
- मानद सदस्य - इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ योग, हेलप्रॅक्िटकर, जर्मनी
- मार्गदर्शक - लोणावळा योग इन्स्टिट्यूट, लोणावळा
- मानद सल्लागार व संशोधन समिती सदस्य - कौवल्यधाम योग संस्था, लोणावळा
- मानद सदस्य - कैवल्यधाम प्लॅटिनम ज्युबिली कार्यकारी समिती व आंतरराष्ट्रीय योग संमेलन
- सदस्य-अॅसोसिएशन ऑफ ब्रिटिश स्कॉलर्स
- माजी सदस्य - संशोधन समिती, तृतीय जागतिक काँग्रेस, योग व आयुर्वेद, इटली
- `शवासन-ध्यान` व `स्वानंद सहयोग साधना ` या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांचे जनक व प्रणेते.
- शवासनातून आत्मविकास, मन:शांती व मनाचे आरोग्य, संकल्पपूर्तीचा राजमार्घ, स्वानंद सहयोग साधना,सहयोग सूत्रे, ध्यान एक दर्शन व मार्गदर्शन, परदेशप्रवासातील योगचिंतन, योग आणि मन आणि नाईन सिक्रेट्स ऑफ सक्सेसफुल मेडिटेशन या योगावरील गाजलेल्या नऊ पुस्तकांचे लेखक. हे पुस्तक आता गुजराथी, हिंदी आणि पोर्तुगीज भाषेत उपलब्ध
- योग ह्या विषयावर सकाळ, लोकसत्ता, लोकमत, नवाकाळ, पुढारी, साप्तहिक सकाळ, योगतरंग, योगप्रकाश, प्रभात, पुढारी, केसरी, यासारख्या आघाडीच्या वृत्तपत्रांमधून व नियतकालिकांमधून प्रबोधनपर विपुल लेखन.
- दूरदर्शन व आकाशवाणीवर अनेक वेळा कार्यक्रम
- बी.बी.सी., फ्रान्स व नॉर्दर्न आयर्लंड वर मुलाखती
- फाय फाऊंडेशनच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी
- मदर तेरेसा, सुनील गावसकर, उस्ताद अमजद अलीखान, माजी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांसारख्या मान्यवरांना प्राप्त् झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील `विजयश्री` पुरस्काराने सन्मानित
----------------------

जन्मतारीख : ८ जुलै १९४९
पत्ता : 'शांति-मंदिर', २१००, सदाशिव पेठ, पुणे, ४११ ०३०, भारत