सहयोग सूत्रे
सहयोग सूत्रे:
प्रथम प्रकाशन: १४-०१-१९९५
चालू प्रकाशन: प्रथम
मूल्य: २५ रु.
सूत्र-माला
व्यक्तिगत साधनेतील नियमितता, सातत्य आणि अखंडता
वृत्तीतील विनम्रता व सहजता
आचार-विचारातील एकवाक्यता, एकात्मता
उत्साहीपणा, आनंदीवृत्ती
मदत करण्याची वृत्ती
परस्परांमध्ये स्पर्धा नसावी
न्यूनगंडही नसावा व अहंगंडही नसावा
दुसर्याचे म्हणणे नीटपणे, आदरपूर्वक, उदारपणे, प्रेमाने ऐकून घेणे
आपले म्हणणे साध्या, सोप्या, सरळ, स्पष्ट भाषेत सहजपणे, मुद्देसूदपणे आणि आत्मविश्वासपूर्वक मांडावे
निश्चित माहीत असेल, तेवढेच बोलावे. वृथा अभिमान बाळगू नये किंवा बनवाबनवी करू नये. माहीत नसेल तर मान्य करावे.
वागण्यात आपुलकी असावी. प्रत्येकाशी आंतरिक नाते प्रस्थापित करावे.
निष्ठा म्हणजे दुराग्रह नव्हे.
आपली परंपरा तेवढी श्रेष्ठ आणि इतरांची कनिष्ठ असे कधीही वाटता कामा नये.
विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्य़ापूर्वी, प्रश्न नीट समजून घेऊन त्याला अनुरुप असे उत्तर द्यावे.
स्वतःविषयी व संस्थेविषयी फुशारक्या मारु नयेत.
खेळकरपणा अवश्य असावा, पण बालिशपणा निश्चितच नसावा
विनोदबुध्दी असावी पण तिचा अतिरेक टाळावा. त्यातून कटुता निर्माण होऊ देऊ नये.
वेळेवर कार्यक्रम सुरु करुन वेळेवर संपवावेत
बाष्कळ गप्पा, उखाळ्यापाखाळ्या, अतिवाचन, अतिश्रम टाळावेत.
कुणाही व्यक्तीविषयी, अथवा संस्थेविषयी दुरुद्गार काढू नयेत
विनम्रता म्हणाजे कमकुवतपणा नव्हे आणि आत्मविश्वास म्हणाजे उध्दटपणा नव्हे.
लोकांच्या टीकेमुळे दुःखी होऊ नये व स्तुतीने हुरळून जाऊ नये.
आपण अका अत्यंत महान, विशुध्द अशा व्यास परंपरेचे प्रतिनिधित्व करतो आहॊत, हे कायम ध्यानात ठेवावे.
हे ईश्वरि कार्य सेवा-भावनेने करायचे आहे.
आपण संवाद साधायला जावे, उपदेश करायला नाही.
सर्व सहयात्रींना एका स्नेहाच्या धाग्याने जोडावे.
